कर्ज फेडण्यासाठी घडविले स्वतःचेच अपहरणनाट्य, कोतवाली पोलिसांकडून आठ तासांत गुन्हा उघड

प्रातिनिधिक

एका हॉटेलमध्ये काम करणाऱया वेटरने कर्ज फेडण्यासाठी स्वतःचेच अपहरणनाट्य घडवून आणल्याचा प्रकार कोतवाली पोलिसांनी केवळ आठ तासांत उघडकीला आणला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आकाश एकनाथ मुळे (वय 23, रा. शिराळ चिचोंडी, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. आकाश हा संगम हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. काल रात्री साडेबारा वाजता त्याची डय़ुटी संपली. मात्र, रात्री दोन वाजूनही तो घरी न आल्याने त्याचे वडील एकनाथ मुळे यांनी त्याला फोन केला. त्यावेळी ‘कुणीतरी माझे अपहरण केले असून, मला दोन लाख रुपये द्या’, अशी मागणी त्याने केली. त्यावर वडिलांनी त्याला ‘तू कुठे आहे, कुणाकडे आहे’, अशी विचारणा केली असता, आधी मला पैसे द्या, मग ते सांगतो, असे त्याने सांगितले. यानंतर त्याच्या वडिलांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक माणगावकर यांच्या पथकाने आकाशचा शोध घेतला असता, तो नेवासा तालुक्यातील देवगड येथे आढळून आला.

आकाशला कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याला ऑनलाइन जुगाराचा नाद असल्याचे आढळून आले.

आपली प्रतिक्रिया द्या