फेक न्यूज, मेसेजना आळा घालणार, निवडणूक काळात व्हॉट्सऍप क्रमांक ब्लॉक होणार

109
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियावरून फेक न्यूज आणि समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल होण्याचे प्रमाण लक्षात घेता लोकसभा निवडणुकीदरम्यान काही मोबाईल क्रमांक ब्लॉक होण्याची शक्यता आहे. तसेच या युजर्सचे चॅट फीचरही बंद करण्याचा निर्णय व्हॉट्सऍपने घेतला आहे.

लोकसभा निकडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून आणखी सहा टप्प्यांचे मतदान होणार आहे. या काळात व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियावरून निवडणूक, मतदान, राजकीय पक्षाशी संबंधित प्रमाणापेक्षा जास्त मेसेज फॉरवर्ड होण्याची शक्यता आहे. यातील काही मेसेज समाजात तेढ निर्माण करण्यासंबंधी तर काही मेसेजमुळे अनेकांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॉट्सऍपने काही मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहेत.

…तर अकाऊंट बंद होईल
कोणत्याही युजर्सने बल्क मेसेज, ऑटोमेटेड मेसेजचा प्रयत्न करून एखाद्याला व्हॉट्सऍप युजर्सला मेसेज पाठवला आणि त्याने तुमच्या मेसेजला रिपोर्ट केल्यास तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. तसेच अनोळखी व्यक्तीचे नंबर ग्रुपमध्ये ऍड केल्यासही तुम्हाला व्हॉट्सऍप ब्लॉक करू शकतो.
व्हॉट्सऍपच्या नियम आणि अटीनुसार वर्णभेदी, द्वेष निर्माण करणारे मेसेज, धमकी देणारे मेसेज पाठवण्यास मनाई आहे, या नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात कारवाई करण्यात येते.
अनोळखी लोकांना वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज तुम्ही पाठवत असाल तर तुमचा व्हॉट्सऍप क्रमांक रिपोर्ट होऊ शकतो. अशा वेळी व्हॉट्स ऍप तुमचे अकाऊंट ब्लॉक करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या