गेम व्हिडीओवर युद्धाचे नकली फुटेज पीआयबीने दिला इशारा

हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणावाचे खरे फुटेज आहे असे सांगून काही गेम व्हिडीओंमध्ये खोटे फुटेज प्रसारित करण्यात येत आहे. अशा प्रचार पोस्टना बळी पडू नका, असा इशारा पीआयबीने दिला आहे. ‘आर्मा 3’, ‘डिजिटल कॉम्बॅट सिम्युलेटर वर्ल्ड’ या प्रसिद्ध गेम व्हिडीओंच्या खोटेपणाचा पर्दाफाश पीआयबीने केला.

आर्मा ही झेक गेम डेव्हलपर बोहेमिया इंटरएक्टिव्हने विकसित केलेली आणि मूळतः मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी रिलीज केलेली फर्स्ट व थर्ड पर्सन मिलिटरी टॅक्टिकल शूटर्सची मालिका आहे. या सीरिजमध्ये आधुनिक युद्धाचे विविधांगी वास्तववादी चित्रीकरण दाखवण्यावर भर दिला जातो. आर्मा 3 या गेम व्हिडीओमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यानच्या तणावाचे खोटे व्हिडीओ दाखवण्यात आले. डिजिटल कॉम्बॅट सिम्युलेटर हा एक कॉम्बॅट फ्लाइट सिम्युलेशन गेम आहे. या गेममध्ये दुसऱया महायुद्धापासून ते आधुनिक काळापर्यंत विविध कालखंडातील लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टरचा, डॉगफाइटिंग, क्लोज एअर सपोर्ट व सीएडी मिशन्ससारखी विविध लढाऊ ऑपरेशन्स दाखवली जातात.