
गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात होत असलेली दरवाढ आता थांबली आहे. सोन्याची झळाळी काही प्रमाणात उतरली असून चांदीही स्वस्त होत आहे. सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत 1,375 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. 24 पॅरेट सोने प्रति तोळा 1,19,253 रुपये झाले आहे.
माऊंट एव्हरेस्टवर हेलिकॉप्टरला अपघात
नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ अल्टिटय़ुड एअरचे हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. लुक्लामध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर रवाना झाले होते. लोबुचे हेलिपॅडवर उतरताना हे हेलिकॉप्टर बर्फात फसले.
शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स–निफ्टीत घसरण
विदेशी गुंतवणूकदारांनी 2540.16 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केल्याने गुरुवारी शेअर बाजार गडगडला. हिंदुस्थानी शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 593 अंकांनी घसरून 84,404 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176 अंकांनी घसरून 25,878 अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 3.5 लाख कोटी रुपये बुडाले. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्पेट 4,75,04,242 कोटी रुपयांवरून 4,71,56,416.40 कोटींवर आले.
 
             
		



































 
     
    



















