
सौदी अरबमध्ये झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील सदस्य सौदीला जाणार आहेत, अशी माहिती तेलंगणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांवर उद्या गुरुवारी अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा सरकारचे एक पथक सौदी अरबला पोहोचले आहे. मृत्यू प्रमाणपत्रासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. तेलंगणा सरकारसह सौदी सरकार मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची शक्यता आहे.




























































