पनवेलजवळ रस्ता समजून कार नदीत घुसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पनवेल

काळ आला होता.. पण वेळ नाही.. याचीच प्रचीती सोमवारी शेख कुटुंबाला आली. पावसामुळे  सगळेच रस्ते गुडघाभर पाण्यात गेल्याने रस्ता समजून पनवेलजवळ चालकाने कार चक्क घोटा नदीत घुसवली. दुथडी भरून वाहणाऱया नदीच्या प्रवाहातून ही कार ३० ते ४० फूट पुढे गेली. सुदैवाने नदीपात्रातील दगडांमुळे ती मध्येच अडकून पडली. याची माहिती घोट गावातील गावकऱयांना कळताच त्यांनी धाव घेऊन नदीत उडय़ा मारल्या. गाडीची पुढील काच तोडली व खलील शेख, त्यांची पत्नी हमिरा, मुलगी सुहाना, नमिरा यांना बाहेर काढून कारच्या टपावर बसवले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने या चौघांनाही सुखरूप नदीच्या काठावर आणले.  घोट गावातील नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, अशरफ शेख, नारायण पाटील, लहू पाटील व ग्रामस्थांनी देवदूत बनून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.