
गजानन कोळी ऊर्फ गजा शेट्टी (81) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध इंजिन मेकॅनिक अशी गजानन कोळी यांची ओळख होती. शेकडो तरुणांना त्यांनी प्रशिक्षण देऊन मेकॅनिक म्हणून तयार केले. दरम्यान, गजानन यांच्या पार्थिवावर वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.