प्रसिद्ध इन्स्टाग्रामरने केली आईची हत्या, सुऱ्याने हृदय बाहेर काढलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध इन्स्टाग्रामरने आपल्या आईची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या केली आहे. धारदार चाकूने तिने आईच्या शरीराचे तुकडे केले आणि हृदयासह अन्य अवयव बाहेर काढले. त्यामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला.

ही घटना पूर्व युरोपातील एक देश मॉल्डोवा इथे घडली आहे. या घटनेतील आरोपी ही 21 वर्षांची तरुणी असून ती इन्स्टाग्रामर म्हणून प्रसिद्ध आहे. तिचं नाव एना लेकोविच असं आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एनाची आई प्रस्कोव्या ही तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. ती जर्मनीत राहून नोकरी करत होती आणि काही काळासाठी आपल्या मुलीकडे राहायला आली होती. प्रस्कोव्या यांना एना अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचा संशय होता. त्यामुळे त्या तिच्यावर वैद्यकीय उपचार होण्यासाठी तिच्यासोबत येऊन राहू लागल्या होत्या.

पण, काही दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळला. त्या मृतदेहाची अवस्था भीषण होती. शरीराच्या आतील अनेक अवयव बाहेर काढण्यात आले होते. त्यासाठी स्वयंपाकघरातील चाकूचा वापर करण्यात आला होता.

पोलिसांनी काही प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे एना हिला अटक केली. वैद्यकीय शिक्षण घेतलेली व्यक्ती ज्या प्रकारे चाकू चालवते, त्याचप्रकारे तिचे अवयव वेगळे करण्यात आले होते. त्यामुळे प्रस्कोव्या यांचा मृत्यू झाला.

प्रस्कोव्या यांचं एनावर खूप प्रेम होतं आणि तिच्यासोबत त्या पुष्कळ वेळ व्यतित करत. पण एनाने जे केलं, त्याची कुणालाच कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया एनाच्या काकांनी दिली आहे. एना ही अंमली पदार्थांच्या आहारी गेली असावी आणि त्यातच तिने आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.