
शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षापेक्षा हेक्टरी कमी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याचा निषेध करीत शेतकरी संघटनेच्या वतीने शासन निर्णयाच्या प्रतीची होळी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आल. सोबतच 50 हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली करण्यात आली. दिपक चटप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.