
सामना प्रतिनिधी, मुंबई
अकोल्यामधील एका शेतकऱ्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दिनकर निवृत्ती जाधव (61) असे या शेतकऱयाचे नाव असून त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिनकर जाधव हे याआधी सैन्यात होता, मात्र त्यांना सैन्यातून काढण्यात आले. आपल्याला काही कारण न देता सैन्यातून काढण्यात आले. यासंदर्भात पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाकडे दाद मागितली. यासाठी लष्करप्रमुखांकडेही दाद मागितल्यानंतरही जाधव यांना न्याय मिळाला नाही.
त्याचप्रमाणे शेतीसाठी तीन लाख 20 हजार रुपये कर्ज घेतले. ते फेडण्यासाठी सोने गहाण ठेवून दोन लाखांचे कर्ज घेतले. यानंतर त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला. मात्र तरीही कर्जमाफी झाली नसल्याचे जाधवांचे म्हणणे आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी सहाव्या मजल्यावर पोहोचलेल्या जाधवांची त्यांच्याशी भेट झाली नाही. अखेर त्याच मजल्यावरील शौचालयात जाऊन जाधव यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.
summary- farmer attempts suicide at mantralaya


























































