जालन्यात तरुण शेतकऱ्य़ाची विहरीत उडी मारून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्य़ाने विहरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. उद्धव जिगे असे या शेतकऱ्य़ाचे नाव आहे.

अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील उध्दव जिगे हे सकाळी आपल्या शेतात गेले होते. त्यानंतर त्यांची पत्नी शेतात आली. परंतु बराच वेळ झाला तरी शेतात पती न दिसल्याने त्यांनी  त्यांनी आजुबाजुला  शोधा शोध केली. तेव्हा शेताच्या बाजूला असलेल्या नागझरी शिवारातील विहिरीवर शर्ट व बुट आढळुन आले.

ग्रामस्थांनी जिगे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाणी खूप असल्याने त्यांना शक्य झाले नाही.  अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जिगे यांचा मृतदेह बाहेर काढला. जिगे यांचा मृतदेह शवविच्छेदसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, आई -वडील,भाऊ असा मोठा परिवार आहे.  सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.