पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पाटोदा

पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मचिंद्र खाडे (५५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. खाडे यांनी बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

खाडे यांच्यावर बरेच कर्ज झाले होते. त्याची परतफेड करणे शक्य नसल्याने ते गेले काही दिवस निराश होते. शनिवारी या कर्जाला कंटाळून त्यांनी आयुष्याचा शेवट केला. खाडे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.