अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनवट

किनवट तालुक्यातील माळबोरगाव येथील जंगलालगत शेतातील आलेल्या माकडांना हाकलण्यासाठी गेलेल्या लक्ष्‍मण मारोती हनवते या 32 वर्षीय शेतकऱ्यावर अचानकपणे अस्वलाने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले.

तालुक्यातील मौजे माळबोरगाव येथील येथे लक्ष्‍मण मारोती हनवते या 32 वर्षीय शेतकऱ्याचे सिंदगी माथ्या नजीक जंगलालगत शेत आहे. दुपारी साडेतीन वाजता शेतात आलेली माकडे व वानरांना हाकलत असतांना शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो जवळच्या झाडावर चढल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. लक्ष्मण मारुती हनवते यांनी झाडावरून आपल्या भावांना मोबाईलद्वारे याची कल्पना दिली. त्यानंतर जखमी लक्ष्मणला रुग्णालयात आणण्यात आले.