आता 40 लाख ट्रॅक्टर घेऊन घुसणार, राकेश टिकैत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीनही शेतकरी कायदे मागे नाही घेतले तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन राजधानीत घुसू असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेचा आपल्याशी काहीच संबंध नसल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. तसेच या आंदोलनात बंगालचेही शेतकरी सामील होतील असेही टिकैत यांनी म्हटले आहे.

टिकैत म्हणाले की दिल्लीच्या गादीवर लुटेरे बसले आहेत, त्यांना हाकलवून लावायचे आहे. घरात जर चोर शिरला असेल तर आपण काय हवन करतो का ? यांनी पुर्ण देश लूटला आहे. कुठलाही शेतमाल हा हमीभावानेच विकत घेण्यात यावे अशी मागणी टिकैत यांनी केली आहे.

हमीभावावर कायदा का नाही केला जात असा सवाल टिकैत यांनी केला आहे. तसेच देशात ज्या कंपन्या आहेत त्या शेतकर्‍यांना लुटून जातील, आज बटाटे आणि राई पाच रुपये किलोने विकले जात आहेत. सरकारला तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागतीलच आणि देशात हमीभावावर शेतमाल विकत घ्यावा लागेल असेही टिकैत म्हणाले.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेबद्दल टिकैत म्हणाले की, त्या हिंसेचा आणि कृषी कायद्याचा काही संबंध नाही, 26 जानेवारी रोजी ज्याने धार्मिक झेंडा लावला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.