
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन देऊन सत्ता बळकावलेल्या महायुती सरकारने आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार शेतकरी संघटनेने परभणीच्या सोनपेठ पोलिसांत नोंदवली आहे.