शेतकऱयांच्या संघर्षाला महाराष्ट्रातून ताकद देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बैठक

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ताकद देण्यासाठी राज्यातील सर्व समविचारी पक्ष आणि नेत्यांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बैठक झाल्यानंतर दिल्लीत जाऊन शेतकऱयांसोबत असल्याचे जाहीर करण्यात येईल. तसेच 25 जानेवारी रोजी स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोल्हापूर दौऱयावर आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या