
सामना प्रतिनधी । सातारा
साखरवाडी कारखान्याकडून ऊसाचे बिल न मिळाल्याने सालपे येथील 80 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. भगवान मारुती शिंदे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत साखरवाडी कारखान्याकडून बिल मिळाले नसल्याने तसेच वाढत्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. आपले घरात कोणाशीही भांडण किंवा कोणाशीही कसलाही वाद नाही. तसेच आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलीला आणि वाड्यातील माणसांना त्रास देऊ नये, असेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.





























































