पीकविमा न मिळाल्यास स्वातंत्र्य दिनी तीव्र आंदोलन…शेतकऱ्यांचा इशारा

सामना प्रतिनिधी। हडोळती

पीकविमा कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे महसूल मंडळ हडोळती ( ता. अहमदपूर ) अंर्तगत येणाऱ्या गावातील काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाहीये. यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी १ ५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सावरगांव येथील ३५० शेतकऱ्यांनी २०१७-१८ सालचा मिळून ५ लाखांच्या वर खरीप हंगामाचा पीक विमा भरला होता. पण अद्यापपर्यंत सावरगाव येथील एकाही शेतकऱ्याला पीकविमा रक्कम घोषित झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . तसेच या कंपनीवर योग्य ती कारवाई करावी आणि स्वातंत्र्यदिना पर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा. अन्यथा सावरगाव येथील शेतकरी तीव्र ऑंदोलन करतील. अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात एक निवेदनही शेतकऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, पीकविमा कंपनी जिल्हा व्यवस्थापक विजय पस्तापूरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

summary…farmer give warning for protest on 15 august

आपली प्रतिक्रिया द्या