एमएसपी कायद्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्राचे जाचक कृषी कायदे रद्द होऊनही शेतकऱ्यांनी अजूनही आंदोलनाचे शस्त्र म्यान केलेले नाही. आता एमएसपी कायद्यासाठी लढा सुरू ठेवण्यात आला आहे. हरियाणाच्या सोनीपत जिह्यात सहा शेतकऱ्यांनी कुंडली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुख्य व्यासपीठाजवळच उपोषण सुरू केले आहे, एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करावा, या प्रमुख मागणीकडे शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. 7 डिसेंबरपर्यंत हे उपोषण सुरू ठेवले जाणार आहे.