महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या राहाता मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आणि विमा पंपनीकडून अद्यापि कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर बिऱहाड मोर्चा काढला. यावेळी तहसील कार्यालयासमोर चूल मांडून चटणी-भाकरी खात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.