जेव्हा गर्दी उसळते, तेव्हा सरकार बदलते! राकेश टिकेत यांचे कृषीमंत्र्यांना प्रत्युत्तर

शेतकरी जर त्यांनी पिकवलेले धान्य उद्ध्वस्त करू शकतो तर तुम्ही त्यांच्यासमोर काहीच नाही. जेव्हा जेव्हा गर्दी उसळते, त्यावेळी सरकार बदलते, असे प्रत्युत्तर शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी सोमवारी दिले. तर जोपर्यंत केंद्र सरकार शेतकरी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला.

एखाद्या ठिकाणी गर्दी जमली म्हणून कायदे बदलले जाणार नाहीत, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी रविवारी केली होती. याला उत्तर देताना शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनेचे राकेश टिकेत यांनी किसान महापंचायती दरम्यान टीका केली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चेकरिता केंद्र सरकार तयार आहेत. परुंतु त्यांनी गर्दी केली म्हणून कायद्यात बदल केले जातील, असे होणार नाही. अशी घोषण कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी रविवारी केली होती.

यावेळी बोलताना राकेश टिकेत म्हणाले की, मंत्री म्हणतात गर्दी जमली म्हणजे कायद्यात बदल केला जाईल असे नाही. परंतु जेव्हा गर्दी उसळते तेव्हा सरकार बदलते, हे त्यांनी विसरू नये, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. फक्त कृषी कायद्याचाच प्रश्न नसून  इलेक्ट्रासिटी बिल, सीड बिल यासारखे अनेक कायद्ये ते आणू पाहत असल्याचा घणाघात टीकेत यांनी यावेळी केला. हा कायदा गरीबांना उद्ध्वस्त करुन टाकेल. प्रश्न फक्त एका कायद्याचा नसून यासारखे आणखीन बरेच कायदे येणार असल्याची टीका देखील टीकेत यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या