शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहाता

कर्जबाजारीपणाला कंटाळून रामपुरवाडी तालुका राहाता येथील तरूण शेतकरी सोमनाथ शिवाजी म्हसे याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मुलांचा व कुटूंबाचा सांभाळ करण्याची भावाला विनवणी केलेली आहे.

ही घटना गुरूवार दि २५ रोजी सकाळी रामपुरवाडी मधील शेतात उघडकीस आली. मयताचा चुलत भाऊ किरण म्हसे हा शेजारील शेतात पाणी भरण्यासाठी गेला असता त्याला सोमनाथ शिवाजी म्हसे वय ३० वर्ष हा शेतात पडलेला दिसला. त्याने रामपुरवाडीचे पोलीस पाटील बाबासाहेब जगताप यांना याबाबत माहीती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व राहाता पोलिसांना माहीती दिली.

सोमनाथ याला वडील, एक भाऊ, आई, पत्नी व तिन वर्षांची मुलगी व दिड वर्षांचा मुलगा आहे.