
घरांगणा येथील शेतकरी या बांधावर अद्यापही अधिकारी येऊन साधा पंचनामा करत नाही याचा निषेध करण्यासाठी शेतात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता प्रशासनकडून अनेक गावात अद्यापही पंचनामे सुद्धा झाले नाहीये, अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे. शेतात अजूनही पाणी आहे, शेतकऱ्यांचा सोयाबीन शंभर टक्के खराब झाला आहे. 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकरी कर्ज माफीची मागणी करत आहे. जर सरकारनी शेतकऱ्यांची मागणी वर दुर्लक्ष केलं तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्धा येथील उपजिल्हाप्रमुख निहाल पांडे यांनी दिला आहे.


























































