कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी गेल्या 40 दिवसांपासून सिंधू बॉर्डरवर आंदोलन करत असलेले शेतकरी अक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द न केल्यास 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतकऱयांच्या पत्नी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. त्यासाठी हरियाणामध्ये 250 माहिलांना ट्रक्टर चालवण्याबाबत ट्रेनिंग दिले जात आहे. दिल्लीत होणाऱया या ट्रॅक्टर रॅलीत 20 हजार शेतकरी सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱयांकडून कडाडून विरोध केला जात आहे. दिल्ली परिसरात कडाक्याची थंडी असतानाही हजारो शेतकरी आपले घरदार सोडून आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत अशी शेतकऱयांची मागणी असतानाही सरकार मात्र कायद्यामध्ये दुरुस्ती करू असे सांगत आहे. वारंवार चर्चा होऊनही ठोस निर्णय होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. 26 जानेवारीपर्यंत सरकारने कृषी कायदे मागे न घेतल्यास प्रजासत्ताकदिनी लाल किल्ला आणि राजपथ येथे पोहचून ट्रक्टर रॅली काढण्याची योजना शेतकऱयांनी बनवली आहे. या रॅलीचे नेतृत्व पंजाब आणि हरियाणातील महिला करणार आहेत. तसेच रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो शेतकऱयांनीही तयारी केली असल्याचे बीकेयुचे नेते रामराजी ढुल यांनी स्पष्ट केले आहे.
अल्पावधीतच महिला ट्रक्टर चालवण्यात तरबेज
दिल्लीत काढल्या जाणाऱया ट्रक्टर रॅलीत 250 माहिला पुढे टॅक्टर चालवणार असून त्यामागे हजारो शेतकरी ट्रक्टर चालवणार आहेत. यापैकी हरियाणातील अनेक महिला शेतात ट्रक्टर चालवत असल्या तरी त्यांनी कधीही रस्त्यावर ट्रक्टर चालवलेला नाही. त्यामुळेच त्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. त्यानुसार अनेक महिला अल्पावधितच तरबेजपणे ट्रक्टर चालवू लागल्या आहेत.


























































