हिंदुस्थानी जनतेमध्ये विनोदबुद्धी कमीच, माजी यष्टिरक्षक फारूख इंजिनीयर यांनी घेतली गावसकरांची बाजू

हिंदुस्थानचे महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी आयपीएल लढतीदरम्यान विराट कोहलीला उद्देशून केलेले वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या अर्थासह पसरवण्यात आले. त्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनेही सुनील गावसकरांच्या विधानाबद्दल सोशल साईटवर नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी या प्रकरणावर हिंदुस्थानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारूख इंजिनियर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, सुनील गावसकर विराट-अनुष्काबद्दल जर काही म्हणाले असतील तर ते गमतीने म्हणाले असतील. ते कोणाला टीका करण्याच्या उद्देशून म्हणाले नसतील. मी त्यांना चांगला ओळखतो. आम्हा हिंदुस्थानी जनतेमध्ये विनोदबुद्धी थोडी कमीच असते, असे म्हणत त्यांनी सुनील गावसकर यांची बाजू घेतली.

दरम्यान, फारूख इंजिनियर यांनी 2019 सालातील इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी फारूख इंजिनियर म्हणाले होते की, हिंदुस्थानी निवड समितीचे सदस्य हे इंग्लंडमध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला चहा देण्याचे काम करतात. त्यांचे हे विधान अनुष्का शर्मा हिला पटले नव्हते. त्यामुळे तत्काळ तिने आपली प्रतिक्रिया दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या