कहरच, सुरतमध्ये चक्क पादण्याची स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोक काय करतील याच नेम नाही. सुरतमध्ये चक्क पादण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आणि जो कोणी या स्पर्धेत जिंकेल त्याला 5 ते 15 हजारापर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे.

सुरतचे रहिवासी यतीन संगोई आणि मुल संघवी यांनी ही विचित्र स्पर्ध भरवली आहे. 22  तारखेला ही स्पर्धा पार पाडणार आहे.

एके दिवशी यतीन आपल्या कुटुंबीयांसोबत चित्रपट पाहत होता. तेव्हा तो पादला आणि सर्व घरचे हसायला लागले. तेव्हा आपल्याला या अनोख्या स्पर्धेची कल्पना सुचल्याचे यतीनने सांगितले. या स्पर्धेचे तीन निकष असतील. पहिला निकष म्हणजे सर्वात दीर्घ कोण पादणार दुसरा निकष किती मोठ्याने पादणार आणि चालीत पादण्याचा तिसरा निकष असणार आहे. जिंकणार्‍या स्पर्धकाला 5 ते 15 हजार रुपयांपर्यंत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेत सामील होण्यासाठी स्पर्धकांना 100 रुपये शुल्क भरण्याची अटही स्पर्धेत ठेवण्यात आली आहे.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कॉमेडीयन देवांग रावल  उपस्थित राहतील तसेच स्थानिक डॉक्टरही या स्पर्धेला परीक्षक म्हणून हजेरी लावतील अशी माहिती आयोजकांनी दिली.