
एफडीएने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्याविरोधात धडाकेबाज कारवाई सुरूच ठेवली आहे. 1 ते 8 जून या कालावधीत राज्यातील 120 आस्थापनांची तपासणी करत एफडीएने आठ कोटी 25 लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
भेसळ करून किंवा खराब दर्जाचा अन्न साठा विक्री करून तसेच नियमांची पायमल्ली करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दंड ठोठावला आहे. अनधिकृत कृत्य करणाऱ्यांविरोधात एफडीएने कारवाईचा अक्षरशः धडाका लावला आहे. 1 ते 8 जूनदरम्यान एफडीएच्या पथकांनी राज्यातील 120 आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईत आठ कोटी 25 लाख 90 हजार रुपये किमतीचा आठ लाख 10 हजार 876 किलोंचा अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.
पुणे विभागात दोन लाख किलोहून अधिक भेसळीच्या गुळाचा साठा जप्त करण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोकण विभागात लाखो रुपये किमतीचा मिथयाछाप एनर्जी ड्रिंकचा साठा जप्त केला आहे. याशिवाय प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विकणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली.































































