धक्कादायक जादूटोण्याच्या संशयातून महिलेची गळा चिरुन हत्या

नातेवाईक असलेली एक महिला जादूटोणा करत असल्याने आपल्याला सतत आजारपण येत आहे, असा संशय एका युवकाला येत होता. हा संशय बळावल्याने त्याने महिलेचा गळा चिरून हत्या केली. घटनेनंतर तरूण हातात कुऱ्हाड घेऊन घटनास्थळीच थांबला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली आहे.

भोपाळमध्ये मंगळवारी दुपारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपली काकू शांती आपल्यावर जादूटोणा करत असल्याने आपण सतत आजारी पडत आहोत, असे राजूला नेहमी वाटत होते. तो शांतीला ताई किंवा बडी माँ या नावाने बोलवत होता. त्या दोघांचे नाते चांगले असून त्यांच्यात कोणताच वाद किंवा भांडण नव्हते. तरीही राजूने टोकाचे पाऊल उचलल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे.

आपल्या घरात मंगळवारी दुपारी शांती काम असताना शेजारी राहणारा राजू हातात कुऱ्हाड घेऊन तिच्या घरात शिरला. घरात शिरल्यावर त्याने कुऱ्हाडीने शांती यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याने कुऱ्हाडीने शांती याचा गळा चिरला. काय घडते आहे, ते समजण्याच्या आधीच शांती जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर राजू त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करतच होता.

शांती यांच्या ओरडण्याने स्थानिक जमा झाले. त्यांनी राजूला पकडले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हाही राजू हातात कुऱ्हाड घेऊन उभा होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आपण गेल्या काही काळापासून सतत आजारी पडत आहोत. आपल्या काकूने आपल्यावर जादूटोणा केल्यानेच आपल्याला सतत आजारपण येत आहे. त्यामुळे आपण तिची हत्या केल्याचे राजूने राजूने चौकशीत सांगितले. राजूने जादूटोण्याच्या संशयातूनच ही हत्या केली किंवा यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या