‘ट्विटर’वर आता ‘टिकटॉक’सारखं फिचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने आपल्या युजर्ससाठी टिकटॉकसारखे फीचर जारी केले आहे. ‘ट्विट टेक’ असे या फीचरचे नाव आहे. या फिचरमुळे युजर्स एखाद्याच्या व्हिडिओला स्वतःच्या फोटो किंवा व्हिडिओसह उत्तर देऊ शकणार आहेत. सध्या युजर्सना त्यांच्या कोटसह कोणाच्याही ट्विटला उत्तर देण्यासाठी ‘कोट ट्विट’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. परंतु आता त्याच कोट ट्विट रिप्लायमध्ये तुम्हाला आता तुमच्या फोटो आणि व्हिडिओसह रिप्लाय करता येईल. सध्या हे फीचर आयओएस बीटा व्हर्जनवर उपलब्ध असून लवकरच ऍन्ड्रॉईड युजर्ससाठी देखील ते उपलब्ध होणार आहे.