Exclusive- Air Strike आणि कारगिल युद्धाचं ‘मिराज’ कनेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
features-of-the-dassault-mirage-2000-aircraft
युद्धाच्यावेळी शत्रूराष्ट्र हवाई तळांना लक्ष्य करते. अशावेळी मोठे महामार्ग, एक्सप्रेस वे हवाई तळ म्हणून वापरता येऊ शकतात. मिराज हे लढाऊ विमान या कसोटीवर पूर्ण उतरले आहे.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने आज पाक व्याप्त कश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यावेळी फ्रेंच बनावटीच्या ‘दसॉल्ट मिराज 2000’ या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. मिराजच्या 12 विमानांच्या पथकाने सुमारे 1000 किलो वजनाचे बॉम्ब फेकले. 21 मिनिटांची ही कारवाई करून मिराज विमानांचे हे पथक हिंदुस्थानात सुरक्षित परतले. या मिराज विमानांचं देशाच्या सुरक्षेत मोठं योगदान आहे.

मिराजने कारगिल युद्धामध्ये विजयी हल्ला केला होता

1999 मध्ये कारगिल युद्धावेळी मिराज 2000 ने महत्वाची भूमिका बजावली होती. मिराजने लेजर गाइडेड बॉम्ब डागून बंकर उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानी घुसखोरांनी सीमा ओलांडून हिंदुस्थानच्या हद्दीतील अनेक ठाण्यांवर कब्जा केल्याचे हिंदुस्थानच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे मोडून काढणे कठीण होते. अशा वेळी मिराज विमानांचा वापर करून पाकिस्तानी घुसखोरांचे बंक उद्ध्वस्त करण्यात आले होते.