
उत्तर प्रदेशमध्ये फेसबुकवर एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. नंतर तरुणाने तरुणीला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शशांकला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लखनौमध्ये एक तरुणी आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. फेसबुकवर तिचे ओळख शशांक या तरुणाशा झाली. शशांक मुळचा वाराणसीचा रहिवासी असून मुझ्झफरनगरमध्ये राहत होता. दोघे सोशल मीडियावर चॅट करायचे आणि दोघांमध्ये प्रेम झाले.
एक दिवस शशांकने तरुणीला मुझ्झफरनगरमध्ये भेटायला बोलावले. तरुणी त्याला भेटायला गेली, तेव्हा शशांकने तिच्यावर बलात्कर केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ शूट केला. पीडित तरुणी घरी पोहोचली पण तिने पोलिसांना याबाबत काही सांगितले नाही. नंतर शशांक तरुणीला त्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल करत होता. अखेर या सगळ्या प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी शंशाकला शोधून त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































