तळागाळात योगदान देणाऱ्या व्यक्तींसोबत पुरस्कार घेताना मी ‘अपात्र’ वाटतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळागाळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींसोबत पुरस्कार स्वीकारताना मला ‘अपात्र’ वाटले, अशी भावना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी ट्विटरद्वारे व्यक्त केली. त्यांना सोमवारी व्यापार व उद्योग क्षेत्रातील ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावर त्यांनी ही भावना व्यक्त केली. सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांच्या स्वरुपामध्ये बदल घडवून आणला आहे. आता प्रामुख्याने तळागाळात समाजाच्या सुधारणेसाठी मौलिक योगदान देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. मला त्यांच्या श्रेणीत सामील होण्यास योग्य वाटले नाही, असे ट्विट महिंद्रा यांनी केले. त्यांनी तुलसी गौडा यांना पद्म पुरस्कार मिळाल्याचा फोटोही शेअर केला.