वर्सोव्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, कारण अस्पष्ट

559
file photo

नैराश्यातून महिला डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. निवेदिता बिजलानी असे मृत डॉक्टरचे नाव आहे. वर्सोवा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

निवेदिता या पूर्वी अमेरिकेत प्रॅक्टिस करत होत्या. गेल्या वर्षी त्या मुंबईत आल्या होत्या. त्या आई-वडील, दोन मुलासह वर्सोवा येथे राहतात. नैराश्यामुळे त्रस्त असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी गेल्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

सोमवारी रात्री निवेदिता यांनी झोपेच्या गोळ्या खाल्या. आज सकाळी त्यांचे वडील बेडरूममध्ये गेले असता निवेदिता या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. घडल्या प्रकाराची माहिती समजताच वर्सोवा पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी निवेदिताच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. निवेदिता यांचे पीएमसी बँकेत खाते आहे. त्याच्या आत्महत्येचा पीएमसी बँक प्रकरणी थेट संबंध नसल्याचे वर्सोवा पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसात दोन खातेधारकांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या