फिफा फुटबॉल: हाताचं बोट दाखवीन तिथं वाद

सामना ऑनलाईन । रशिया

मंगळवारी रात्री नायजेरियाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जेंटीनानं नायजेरियाला २-१ अशा फरकानं हरवलं. यामुळे अर्जेंटीनाचा संघ फिफा वर्ल्डकप २०१८च्या नॉकआउट टप्प्यात पोहोचला आहे. लिओनेल मेस्सी व मार्कोस रोजोच्या गोलमुळे अर्जेंटीना शेवटच्या १६मध्ये पोहोचू शकली आहे. अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू व संघाचे माजी व्यवस्थापक डिएगो मॅराडोना यांनी फुटबॉलच्या मैदानावर सामनादरम्यान उपस्थिती लावली होती. यावेळी ते देहभान विसरून सामन्याचा आनंद लुटत होते. त्यांच्या या अतिउत्साहामुळे मॅराडोना यांना चक्क रुग्णालयात दाखल करावं लागलं.

रोजोने तारले, अर्जेंटिनाची बाद फेरीत धडक

नायजेरियाविरुद्ध मंगळवारी रात्री रंगलेल्या अर्जेंटीनाच्या सामन्याकरता मॅराडोना यांनी हजेरी लावली होती. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फुटबॉल चाहत्यांमध्ये आनंदाचे वारे वाहू लागले होते. अर्जेंटीनाचा सामना पाहताना मॅराडोना यांचा उत्साह एवढा वाढला होता की, देहभान विसरून त्यांनी हातानं अश्लील हातवारे केले. तसंच मेस्सीनं पहिला गोल केला तेव्हा सामना जिंकण्याकरता ते देवाकडे प्रार्थना करताना दिसून आले. यानंतर जेव्हा मार्कोस रोजोनं ८६व्या मिनिटाला दुसरा गोल केला तेव्हा मॅराडोना यांनी हाताचं मधलं बोट वरती करून त्यांचा आनंद प्रेक्षकांना दाखवून दिला. अर्जेंटीनाच्या विजयाच्या अतिउत्साहामुळे अचानक मॅराडोना अचानक बेशुद्ध पडले. यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखलं केलं गेलं. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मॅराडोना यांना सामन्याच्या मैदातून बाहेर घेऊन जातानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

फिफा विश्वचषक २०१८ : आनंद पोटात माझ्या माईना

मॅरोडाना यांनी फुटबॉलच्या मैदानावर लावलेली उपस्थिती व त्यांचा अर्जेंटीना जिंकल्याचा आनंद पाहण्याजोगा होता. परंतु मॅराडोना यांनी केलेले अश्लील हातावारे हे नेमके नायजेरियाबद्दच्या रागाचे होते की अर्जेंटीना विजयी झाल्याचे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या अशा वागण्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू झाली आहे. कोणी मॅराडोना यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून संबोधत आहेत, तर कोणी त्यांच्या या वागण्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या