
सामना ऑनलाईन । मॉस्को
मंगळवारी रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये मार्कोस रोजोच्या गोळच्या बळावर अर्जेंटिनाने नायजेरियाचा २-१ अशा गोल फरकाने पराभव करत बाद फेरीमध्ये प्रवेश केला. रशियामध्ये सुरू असलेल्या २१ व्या फुटबॉल विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाचा हा पहिलाच विजय आहे.
‘स्वीपर’ ते ‘गोलकीपर’, फुटबॉल खेळाडूचा अविश्वसनीय प्रवास
पहिल्या सामन्यात आइसलॅण्डविरुद्ध १-१ बरोबरी आणि दुसऱ्या सामन्यात क्रिएशियाविरुद्ध सामन्यात ३-० असा पराभव सहन केल्याने नायजेरियाविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाला विजय आवश्यक होता. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. १४ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार स्टायकर लिओनेल मेस्सीने स्पर्धेतील पहिला गोल करत संघाला १-० आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत अर्जेंटिनाने ही आघाडी कायम राखली आणि नायजेरियाला बरोबरी करण्याची संधी दिली नाही.
फिफा विश्वचषक २०१८ : आनंद पोटात माझ्या माईना…
दुसऱ्या हाफमध्ये नायजेरियाचे खेळाडू अधिक आक्रमक झाले. अर्जेंटिनाचे खेळाडू थकल्यासारखे आणि दबावात वाटत होते. नायजेरियाच्या बालोगनला अर्जेंटिनाचा खेळाडू माश्वेरानो याने चुकीच्या पद्धतीने रोखल्याचे निदर्शनास आल्याने पंचांनी नायजेरियाला पेनल्टी दिली. ५ १व्या मिनिटाला यावर गोल करत व्हिक्टर मोसेसेने संघाला बरोबरी साधून दिली. नायजेरियाला बाद फेरीमध्ये जाण्यासाठी सामना बरोबरीत ठेवणे आवश्यक होते. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या परंतु त्यावर गोल करण्यात ते अपयशी ठरले. ८१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला खेळाडू रोजोला गोल करण्याची सोपी संधी मिळाली परंतु त्याने ती दवडली. अखेर सामना संपण्यासाठी चार मिनिटांचा अवधी असताना इव्हान मार्सडोच्या जबरदस्त क्रॉसवर रोजोने उजव्या पायाने चेंडू जाळीमध्ये ढकलला आणि अर्जेंटिनाने जल्लोष केला. मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षक आणि विश्वविजेत्या संघाचा माजी खेळाडू मॅराडोना यांच्या डोळ्यात अश्रू तरारले.
क्रोएशियाचा आइरलॅण्डवर विजय
‘डी’ गटातील दुसऱ्या एका सामन्यात क्रोएशियाने आइसलॅण्डचा पराभव केला आणि विजयाच्या हॅटट्रिकसह बाद फेरीत प्रवेश केला. क्रोएशियाने आइसलॅण्डचा २-१ असा पराभव केला. ग्रुप ‘डी’ मधून क्रोएशियासह अर्जेंटिनाने बाद फेरीमध्ये प्रवेश केला.
फिफा विश्वचषकाच्या सर्व बातम्यांसाठी येथे क्लिक करा
























































