जिओचा आयपीओ अवघ्या 100 मिनिटांत सोल्ड आऊट; 30 हजार 188 कोटी रुपये उभारणार, उद्यापर्यंत बोली लावता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा 30,213 कोटींचा जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ बुधवारी पहिल्याच दिवशी अवघ्या 100 मिनिटांमध्ये फुल सब्सक्राइब झाला आहे. सर्वात वेगाने सब्सक्राइब झालेल्या या आयपीओने पहिल्याच दिवशी 6,900 कोटींची गुंतवणूक पार केली. तसेच एकूण 3.2 लाख कोटी अँकर बुकसोबत गुंतवणुकीची डिमांड आहे. जिओच्या एका शेअरची किंमत 1 हजार 65 रुपये ते 1 हजार 119 रुपये इतकी आहे. आयपीओचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एका गुंतवणूकदाराला कमीत कमी 13 हजार 428 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

एका गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 14 लॉट्स म्हणजेच 168 शेअर्सची किंमत 1 लाख 87 हजार रुपये गुंतवावे लागणार आहे. जिओ या आयपीओतून 30 हजार 188 कोटी रुपये उभारणार आहे. लिस्टिंगनुसार पंपनीचे बाजार भांडवल 10.30 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ 21 ऑक्टोबरला खुला झाला असून 23 ऑक्टोबरला बंद होणार आहे. या आयपीओला बाजारात 28 ऑक्टोबरला लिस्ट केले जाणार आहे. आयपीओअंतर्गत कंपनीने 27 कोटी स्टॉक्स बाजारात उतरवले आहेत. कंपनीने याआधीच 212 अँकर गुंतवणूकदारांकडून 8,109.84 कोटी रुपये मिळवले होते.

कर्मचारी–भागधारकांसाठी तीन हजार कोटींचे शेअर्स राखीव

कर्मचाऱ्यांसाठी 500 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱयांना प्रत्येक शेअरवर 54 रुपयांची सवलतही मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पात्र भागधारकांसाठी अडीच हजार कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. 26 ऑक्टोबरला शेअर अलॉटमेंट होईल. 27 ऑक्टोबरला रिफंड आणि 28 ऑक्टोबरला आयपीओ बाजारात लिस्टिंग केला जाणार आहे. आयपीओमधून मिळणाऱया रकमेचा वापर पंपनी रिलायन्स जिओ इन्पह्कॉम लिमिटेडच्या कर्जाची रक्कम परतफेड करणार आहे. तसेच जनरल कॉर्पोरेट कामांसाठी या पैशांचा वापर करणार आहे.