
गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. असीम ध्येयनिष्ठsने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या 36 पोलीस अधिकारी आणि 118 पोलीस अंमलदार अशा एकूण 154 पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून पोलीस हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केले.
यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी यावेळी पुष्पचक्र वाहून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.
























































