‘मैत्रेय’ कंपनीतील महिला गुंतवणूकदारांचे शिवसेनेला साकडे, आमदारांनी दिला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shiv-sena-mla-kishor-patil

सामना प्रतिनिधी । पाचोरा

कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांनी आपला प्रश्न शिवसेनाच सोडवू शकेल असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना आपलं निवेदन आहे. गेल्या दोन वर्षांपासून मैत्रेय कंपनीत गुंतवणूक करून फसगत झालेल्या महाराष्ट्रातील ८९ लाख ठेवीदारांच्या पैशांसाठी मी शासन दरबारी भांडत आहे. या दोन वर्षाच्या काळात या विषयावर झालेली कारवाई समाधानाकारक असून येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह देशातील सर्वच गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे मिळवून देणारच अशी ग्वाही मदार किशोर पाटील यांनी दिली.

आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी आज पाचोरा- भडगाव तालुक्यातील मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणुक केलेल्या सुमारे १०० महिलांनी भेट घेतली. ठेवीदार व एंजट यांच्यात या आर्थिक फसवणूकीमुळे वाद उद्भवत असून ठेवीदार आता थांबायला तयार नसल्याने या प्रकरणी अधिक लक्ष घालवा यासाठी निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्षा सुनीता किशोर पाटील, अॅड. दिनकर देवरे, गणेश पाटील, प्रवीण पाटील, व स्वीय साहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते.

निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार किशोर पाटील संबधीत महिलांना आश्वासित करत सांगितले की, दोन वर्षांपूर्वी पावसाळी अधिवेशनात मैत्रेय कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात ८९ लाख गुंतवणूकदारांच्या ठेवी या परत मिळण्यासाठी तारांकित प्रश्न मी उपस्थित केला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली. दोन वर्षात या समितीने मैत्रेय कंपनीच्या संचालकांनी वेगवेगळ्या नावाने सुमारे २६० ते २६८ ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केलेली शोधून काढली आहे. या सर्व मालमत्तेचा सर्च रिपोर्ट तयार करणे, त्यांची बाजार किंमत काढणे त्यानंतर ती ताब्यात घेवून तिचा लिलाव करण्यासाठी न्यायालयाची परवानगी काढणे अशी प्रक्रिया येणाऱ्या काळात होणार आहे. हा विषय मोठा आहे राज्यात व देशात याचे जाळे पसरले आहे. गेली दोन वर्ष आपण वाट पाहून आहात आता फक्त काही महिने थांबा. आतापर्यंत राज्यासह देशात अनेक कंपन्यांनी आमिष दाखवून जनतेला लुटले परंतु एकालाही पैसा परत मिळाला नाही. मात्र मैत्रेयमधून सर्वांनाच पैसा मिळेल. गुंतवणुकदारांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली. दि. २६ ऑक्टोबर रोजी या समितीची बैठक झाली यावेळी मी उपस्थित नसल्याने मला माहिती मिळाली नाही. मात्र लवकरच दीपक केसरकर यांची भेट घेऊन या विषयाला गती देण्यासाठीची विनंती मी करणार आहे. एजंट व गुंतवणूकदारांनी आपसात वाद करू नये, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.