
जालना तालुक्यातील काजळा फाटा शिवारातील गणेशनगर परिसरातील शिवारात असलेल्या शेतीच्या वादाच्या वळणावरून दोन गटात तुंबळ हाणामारीतून दगडफेक झाल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी सकाळी 14 जून रोजी घडला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील चार ते पाच जण गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत तालुका पोलीस ठाण्यात रक्तबंबाळ अवस्थेत दाखल झाल्याने पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यांची एकच धांदल उडाली. कर्तव्यबजावत असलेल्या पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना तात्काळ शासकीय वाहनात घालून जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी हलवले असून पोलिसांचे एक पथक काजळा फाटा परिसराकडे रवाना करण्यात आले आहे.
शेताच्या बांधाच्या वादातून दोन गटात ही तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. लाठ्या काठ्यांनी ही तुंबळ हणामारी झाल्याने तिन जणांच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत तर एकाचा पाय ही फॅक्चर झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तालुका पोलीसांच्या वतीने शासकीय सामान्य रूग्णालयात जखमींचे जवाब घेणे
सुरु असून जखमींच्या जवाबानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती आहे. मुस्ताक रा.जालना, सिद्धार्थ, बाळू बाबुराव कावळे, बाबुराव उमाजी कावळे रा. गोलापांगरी असे जखमींचे नाव आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.
























































