
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करता येणार नाही असे त्यांच्या आदेशात म्हटले आहे. परीक्षांची तारीख बदलली जाऊ शकते मात्र त्या रद्द केल्या जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की राज्यांना परीक्षा घ्याव्याच लागतील. संबंधित राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार राज्य सरकारे परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. तारखा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारांनी UGC शी सल्ला मसलत करावी असे न्यायालयाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
Supreme Court upholds the University Grants Commission’s July 6 circular to hold University final year exams.
Court says States must hold exams to promote students. It says states under Disaster management Act can postpone exams in view of pandemic & can consult UGC to fix dates pic.twitter.com/EcLcgLuRIz
— ANI (@ANI) August 28, 2020
30 सप्टेंबरपर्यंत ज्या राज्यांना परीक्षा घेणे शक्य नाही त्यांनी युजीसीकडून पुढील दिशानिर्देश प्राप्त करावेत असेही न्यायालयाने सांगितले आहे.
States, which are not inclined to hold final year exams by September 30, will have to make representation to UGC, says SC
— Press Trust of India (@PTI_News) August 28, 2020
मुंबईसह देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावला. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी)जाहीर केली होती. परंतु अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द कराव्या या मागणीसाठी युवा सेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. युवा सेना प्रमाणेच दिल्लीसह इतर राज्यांनी आणि तेथील विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
States are required to hold final year exams as per UGC guidelines and for any exemption they will have to seek permission: SC
— Press Trust of India (@PTI_News) August 28, 2020
18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात पण रद्द होऊ शकत नाहीत अशी भूमिका जाहीर केली होती. परीक्षा न घेता पदव्या देण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही असेही यूजीसीने म्हटले होते. यूजीसीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमुर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बाजू मांडली होती. सॉलिसिटर जनरल मेहता यांनी खंडपीठाला सांगितले होते की, ‘परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा केंद्र सरकारला आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर संपूर्ण देश पुन्हा कामाला लागला आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी हे 21-22 वर्षे वयाचे आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये का? 30 सप्टेंबर ही डेडलाईन जबरदस्तीने नाही तर विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीच देण्यात आली आहे. सर्व विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.’
याच सुनावणीत विद्यार्थ्यांच्या वतीने ऍड. अलख श्रीवास्तव यांनी बाजू मांडताना सांगितले की परीक्षा घेतल्या न गेल्याने शिक्षणाच्या दर्जावर काहीच परिणाम होणार नसून आयआयटीसारख्या महत्वाच्या संस्थेनेही परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे.ऍड. अरविद दातार यांनीही विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. विद्यार्थ्यांचे कल्याण आणि सुरक्षा महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यूजीसीने विद्यापीठांना त्यांचे स्वत:चे अभ्यासक्रम बनवण्यासाठी परवानगी दिलेली आहे, मग आता विद्यापीठांवर सक्ती का करत आहे असा युक्तिवाद त्यांनी केला होता.


























































