
फेडरल बँकेने 1 जून 2025 पासून आपल्या सर्विस चार्ज आणि फीमध्ये मोठा बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. या नव्या बदलामुळे थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. या नव्या बदलामुळे पॅश ट्रान्झॅक्शन, एटीएमचा वापर, मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यास दंड यासोबतच 6 महिन्यांच्या आत जर बँक खाते बंद केले, तर ग्राहकांना 100 रुपये दंड द्यावा लागणार आहे. 6 ते 12 महिन्यांच्या आत खाते बंद केल्यास 300 रुपये दंड भरावा लागणार आहे. 14 दिवसांच्या आत बँक खाते बंद केल्यास कोणताही दंड द्यावा लागणार नाही. दुसऱया बँकेतील एटीएममधून पॅश काढल्यास 23 रुपये आणि बॅलेन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंटवर 12 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. चेक रिटर्न केल्यानंतरसुद्धा चार्ज लागणार आहे. ग्रामीण खाते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 400 रुपये, तर अन्य खात्यातील चेक रिटर्न केल्यास 500 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
पॅश ट्रान्झॅक्शनवरसुद्धा मर्यादा आली आहे. दर महिन्याला केवळ 5 ट्रान्झॅक्शन आणि 5 लाखांपर्यंतची रक्कम फ्री असणार आहे. यापेक्षा अधिक ट्रान्झॅक्शन केल्यास प्रत्येत ट्रान्झॅक्शनवर 1 हजार रुपये अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे.