संभाजीनगरमध्ये संचारबंदीत फिरणार्‍या 35 जणांवर गुन्हे दाखल

827

लॉकडाऊनच्या काळात शहरात संचारबंदी लागू असताना विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांनी आपला दांडूका उगारला आहे. मात्र त्यानंतरही ज्यांनी ऐकले नाही अशा 35 जणांवर गेल्या 48 तासात संभाजीनगरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर 728 वाहनधारकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस ठाणेनिहाय गुन्हे पुढीलप्रमाणे, सिटीचौक – 5, क्रांतीचौक – 6, जिन्सी – 11, जवाहरनगर – 6, पुंडलिकनगर – 3, छावणी, एमआयडीसी वाळुज, वेदांतनगर, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर विनाकारण फिरणार्‍या 728 वाहनधारकांवर थेट कारवाई करीत मोटार वाहन कायद्यान्वये पोलिसांनी दंड वसूल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या