हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

562

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी लातूरमध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमधली ही घटना आहे.

विद्या केंद्रे यांचे हरिश्चंद्र केंद्रे यांच्याशी 2018 साली लग्न झाले होते. लग्नात विद्या यांच्या घरच्यांनी हरिश्चंद्र यांना साडे सात लाख रुपये हुंडा, तीन तोळे सोने आणि संसारपयोगी साहित्य दिले होते. त्यानंतर लग्नाच्या एक वर्षानंतरही मूल नाही झाले म्हणून विद्या केंद्रे यांचा सासरच्यांनी छळ करण्यास सुरूवात केली. तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी त्यांचा छळ करण्यास सुरूवात केली. अखेर या त्रासाला कंटाळून विद्या केंद्रे यांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्या केंद्रे यांचा पती हरिश्चंद्र यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या