कपलने केला लाईव्ह सेक्स, पोलिसांकडून गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एका दाम्पत्याने आपल्या सबस्क्राईबर्ससाठी लाईव्ह सेक्स केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी सुरू आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.  या घटनेचा उलगडा एका गायकामुळे झाला. डिसेंबर महिन्यात गायक व्यक्ती इंटरनेट सर्फिंग करत असतना एक जाहिरात दिसली होती. या जाहिरातीवर या कपलच्या व्हिडीओचा एक टीजर होता. या व्यक्तीने या जहिरातीवर क्लिक केले. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन झाली. या व्यक्तीने या साईटवर लॉग इन केले आणि याची पेड मेंबरशीप घेतली. तेव्हा या साईटवर एक दाम्पत्य लाईव्ह सेक्स करत होते. इतकेच नाही तर ऑनलाईन हे कपल प्रेक्षकांकडून सल्लेही घेत होते. हे दाम्पत्य मीरारोडचे रहिवासी असल्याचे या गायकाच्या लक्षात आले.

या गायकाने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे दाम्पत्य सेक्स रॅकेट तर चालवत नाही ना याबाबत पोलीस पुढील चौकशी करत आहेत.