नमाज पठण करण्यासाठी जमले, बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

3869

संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे. साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 नुसार आजाराच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता शासनाने बुलडाणा जिल्हा देखील लॉक डाऊन केलेला आहे.असे असताना अनेकजण नमाजासाठी गर्दी करत आहे. बुलढाण्यात नमाजासाठी एकत्र जमलेल्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडहिंग्लजमध्ये नमाजसाठी जमलेले सातजण ताब्यात

तबलीक जमातीचा मरकज प्रकरण सध्या पूर्ण देशात गाजत असतानाच चिखली शहरामध्ये सुद्धा शुक्रवारी जुम्मा नमाज अदा करण्याकरिता 15-20 जण जमा झाले. परंतु सदर बाबीची गुप्त माहिती पेट्रोलिंग दरम्यान चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांना मिळाल्यावरून सदर ठिकाणी जाऊन जणांविरोधात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनची ऐशीतैशी; नमाज पठणासाठी जमले 70 जण, पोलिसांनी घेतले ताब्यात

फक्त बुलढाण्यातच नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नमाज पठणसाठी जमलेल्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोल्हापुरच्या गडहिंग्लमध्येही नमाजसाठी जमलेल्या 7 जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सोलापुरात 70 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. सांगलीत मौलवीसह 41 जणांना ताब्यात घेतेल होते, तर नगरमध्येही 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

मशिदीत एकत्र नमाज पढू दिला नाही म्हणून पोलिसांवर दगडफेक

आपली प्रतिक्रिया द्या