Hit And Run Case – जगनमोहन रेड्डी यांच्यावर एफआयआर

आंध प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात हिट अँड रन प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुंटूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सतीश कुमार यांनी रविवारी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. रेड्डी यांच्या कारखाली पाच दिवसांपुर्वी एका रोड शोदरम्यान 53 वर्षीय व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला होता. चीली सिंघैया असे या व्यक्तीचे नाव असून तो वायएसआरसीपीचा कार्यकर्ता होता.