video – चंद्रपुरात वीज केंद्राला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधील कोल हँडलिंग प्लांटला रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. पॉवर स्टेशनच्या युनिट नंबर 8 आणि 9 साठी या कोल हँडलिंग प्लांटचा वापर होत होता. याच प्लांटमधून दोन्ही युनिटसाठी स्वयंचलित कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून  कोळसा पुरवठा केला जातो. रात्री अचानक याच कोल हँडलिंग प्लांटच्या क्रशर हाऊसमध्ये भीषण आग लागली, ज्यामध्ये या प्लांटचं मोठं नुकसान झाले.

कन्व्हेअर बेल्टचा मोठा हिस्सा यात जळाला. याचा मोठा परिणाम संच आठ आणि नऊच्या वीज निर्मितीवर होण्याची शक्यता व्यक्त होतेय. अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होत. त्याला पहाटे-पहाटे यश आलं. या आगीचे कारण अजून कळाले नाही. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या