सावंतवाडीतील जय अंबे स्नॅक्स अँड डेअरी दुकानाला आग; दीड लाखाचे नुकसान

सावंतवाडी येथील जोधा रायका यांच्या जय अंबे स्नॅक्स अँड डेअरी या दुकानाला आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हॉटेल मॅंगोच्या परिसरात घडली. मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या महिलांना वेळीच प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यामुळे पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी अशी शक्यता त्यांचे भाऊ राणा रायका यांनी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की,याबाबतची अधिक माहिती अशी की येथील मॅंगो टू परिसरात श्री रायका यांचे जय अंबे स्नॅक्स अँड डेअरी हे दुकान आहे नेहमीप्रमाणे त्यांची भाऊ लादू हे रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते.

दरम्यान पहाटे चार वाजण्याची सुमारास तेथून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दोघा महिलांना दुकानाच्या आतून धूर येताना दिसला त्यांनी याबाबतची माहिती 100 नंबर वरून पोलिसांना दिली पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली त्यानंतर पालिकेचा बंब घेऊन त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी नंदू गावकर आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर आदी दाखल झाले आणि त्यांनी बंबाच्या सहाय्याने आग विझवली या आगीत रायका यांचे फ्रिज आतील साहीत्य बिस्किट फरसाण व अन्य विक्रीचे साहित्य जळून खाक झाले आहे सुदैवाने वेळीच प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असे रायका यांनी सांगितले.