मनोरजवळ केमिकल कंपनीला भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मनोर

पालघर जिल्ह्यातील मनोर परिसरातील्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. सायनर्जी असे या कंपनीचे नाव असून आग विझवण्यासाठी पालघर, बोईसर आणि वसई येथून अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. मुंबई -अहमदाबाद महामार्गालगत सातीवली गावाजवळ ही कंपनी आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमध्ये कंपनीतील केमिकल, फायबर व प्लास्टीकचे साहित्य जळाल्याने परिसरात धुराचे मोठे लोळ उठत आहेत. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…