
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत आगीच्या घटना काही थांबता थांबेना. शनिवारी सकाळी परळ येथील ऑर्बिट टेरेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या 11 व्या मजल्यावर शॉर्ट सर्किट होऊन लाकडी सामानाला आग लागली. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
Mumbai: Fire breaks out in an under construction building near Kamala Mills compound. 5 fire tenders at the spot pic.twitter.com/A7uM3LCEWh
— ANI (@ANI) December 29, 2018
अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या पाच बांधकाम मजुरांना सुखरूप बाहेर काढले असून कोणालाही दुखापत झालेली नाही. ऑर्बिट टेरेस ही इमारत कमला मिल कम्पाउंडसमोरच आहे. दरम्यान, मागील वर्षी 28 डिसेंबर 2017 च्या मध्य रात्री कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला होता.
























































